गौतमीवर वक्तव्य करणारे ह.भ.प. इंदुरीकर महाराज कीर्तनासाठी घेतात इतके पैसे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ मार्च २०२३ ।  आपल्या कीर्तनातून राज्यातील जनतेला भक्तीचा मार्ग दाखविणारे व सध्या नृत्यांगना गौतमी पाटीलवर निशाणा साधणारे ह.भ.प. इंदुरीकर महाराजांनी तिच्या कार्यक्रमासाठी लाखोंनी पैसे मोजणारे लोक किर्तनासाठी नुसते ५ हजार रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

पण स्वतः इदुरीकर महाराज कार्यक्रमाचे किती पैसे घेतात आणि किती कमवतात हे तुम्हाला माहिती आहे का?इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा बोलबाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात आहे. अख्खा महाराष्ट्र इंदुरीकरांना यू ट्यूबवर ऐकतो. त्यांचा फॅन वर्ग तरुण-तरुणींपासून ज्येष्ठांपर्यंत आहे. त्यांची प्रसिद्धी गावागावात पोहचली आहे. त्यांच्या कीर्तनाची बरीच चर्चाही होते. त्यातील शेरेबाजी आवडत नसल्याचं काहींच म्हणणं आहे. पण त्यांच्या कीर्तनाला वास्तवाची किनार असल्याचंही दिसून येतं.

महाराज किर्तनासाठी खूप पैसे घेतात, अशी ओरड सुरू झाल्यावर या प्रश्नाचं उत्तर त्यांनी आपल्या कीर्तनातून दिलं होतं. ते म्हणाले होते की, मलासुद्धा संसार आहे. बायको, मुलं आहेत. तरीही मी कधीही कीर्तनासाठी ठरवून पैसे घेत नाही. कोणीतरी सांगावं की, कीर्तनासाठी महाराजांनी एवढ्या पैशातच होईल असं सांगितलं. उपलब्ध माहितीनुसार महाराज एका कीर्तनासाठी साधारण ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत चार्ज करतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम