येथील बालविकास प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध किल्ले शिवकालीन साहित्य हस्तकला विज्ञान प्रदर्शन भाषण नाटक नृत्य अशा विविध रंगी कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी येथील लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालय येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले होते .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन तर उपाध्यक्ष प्रदिप हिलाल महाजन, कोषाध्यक्ष साहेबराव राघो महाजन, संचालक डॉ. प्रकाश बच्छाव, अर्जुन माळी, संचालिका रोहिणीताई महाजन मुख्याध्यापिका भारती रामकुवर , माता पालक उपाध्यक्ष मनिषा पाटील, पालक प्रतिनिधी निवृत्त पोलिस निरीक्षक अशोक केदार, डॉ. सतीश समीनद्रे, माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, अशोक पंजाबी, पत्रकार नरेंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुरुवातील प्रतिमा पुजन करून कार्यक्रमला सुरुवात झाली. उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांचा सत्कार होऊन त्यांच्या हस्ते ही विद्यार्थींना गौरविण्यात आले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतांवर विद्यार्थीनी नृत्य सादर केले. तर काही विद्यार्थीनी भाषण सादर केले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरानी शाळेच्या वतीने आयोजित हस्तकला, किल्ले, विद्यान प्रदर्शन चे उद्घाटन केले. यावेळी उपक्रमात सहभागी २२५
विद्यार्थ्यांनी हाताने बनवलेल्या उपक्रमांचे परीक्षण मान्यवरांनी केले. यात विद्यार्थीनी सादर केलेल्या शिवकालीन वस्तु, किल्ले, प्रयोगातील माहिती समजावून सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक- मुख्याध्यापिका भारती रामकुवर, सूत्रसंचालन सुनिता सुर्यवंशी, पूजा पाटील, तर आभार वंदना पवार यांनी मानले .
बातमी शेअर करा...
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा