राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा पठन भोवणार ; न्यायालयाचे वॉरंट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ डिसेंबर २०२२ ।  राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर जात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण केली होती. या आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. खार ठाण्यात गुन्हा आणि अटकेनंतर राणा दाम्पत्याची जामिनावर सुटका झाली.

हनुमान चालिसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राणांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राणा दाम्पत्य हजर राहात नसल्याचं दिसून येतंय. येत्या ११ नोव्हेंबर रोजी ठरलेल्या सुनावणीसाठी राणा हजर राहिले नव्हते. त्यामुळे कोर्टाने त्यांना वॉरंट जारी केलं आहे. हे वॉरंट जामीनपात्र आहे. ५ हजारांच्या जामिनावर त्यांची सुटका होईल. मात्र इथून पुढच्या सुनावणींसाठी राणा दाम्पत्याला हजर राहावं लागणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हे वॉरंट जारी केलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम