ठाकरेंची पवारांवर टीका ; मुस्लीम मतासाठी हे…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील मनसे पक्षाचे नेते राज ठाकरे हे पक्षाची बांधणी करण्यासाठी राज्य दौरे सुरु आहेत, त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगतिले कि, मुस्लिम मते दूर जातील, या भीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीही जाहीर भाषणांत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. केवळ शाहु-फुले-आंबेडकरांचेच नाव घेतात, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

पक्षबांधणीसाठी राज ठाकरे आज सिंधूदूर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू झाले. राष्ट्रवादी काँग्रेसनेच आपल्या फायद्यासाठी मराठा व इतर समाजात फूट पाडली.

राज ठाकरे म्हणाले, सध्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्य तसेच चित्रपटातील शिवइतिहासाबाबत वाद सुरू आहेत. मात्र, हे वाद जाणूनबुजून निर्माण केले जात असून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात असे जातीय वाद होत नव्हते किंवा फार कमी प्रमाणात होत होते. तेव्हा काय माणसं इतिहास वाचत नव्हती का? आता सगळेजण वाचायला लागलेत का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू झाले. शरद पवार आपल्या जाहीर भाषणांत कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. याबाबत मी त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले होते की, ‘शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहे, म्हणून मी त्यांचे नाव घेतो.’ मात्र, हा मूळ विचार छत्रपती शिवाजी महाराजांचाच आहे. हा मूळ विचार घेऊन शाहू-फुले-आंबेडकर यांनी कार्य केले ना? राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीने 1999 पासून महाराष्ट्रात जातीय राजकारण सुरू केले. शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. मात्र, त्यांनी काही टोळ्या निर्माण केल्या आहेत. त्यांचा वापर करून मराठा व इतर समाजात फूट पाडली जाते. नंतर दोन्ही समाज आपल्या खिशात घालायचे, असे पवार यांचे राजकारण आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम