दिल्लीत पावसाचा कहर ; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ ।  देशात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु असून आज बुधवारी सकाळपासून दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस बरसत असून राजधानी दिल्लीत मंडी हाऊसपासून रिंगरोडपर्यंत आणि नोएडातील अनेक भागात पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत.

त्याचवेळी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. तेलंगणातील महबूबनगर येथे मंगळवारी संध्याकाळी दोन अल्पवयीन मुली कालव्यात वाहून गेल्या. धोकादायक परिस्थितीमुळे या राज्यांतील धोक्याच्या क्षेत्रांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना बुधवार आणि गुरुवार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने आज महाराष्ट्र, गुजरात, गोवा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वादळाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा यासह 22 हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तराखंडमधील 600 किमी सर्व-हवामान रस्त्यांपैकी 250 किमीवरील भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प झाली. बद्रीनाथ, केदारनाथ आणि गंगोत्रीमध्ये 10-15 हजारांऐवजी रोज फक्त एक हजार भाविक पोहोचत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम