व्हॉट्सअॅप स्टेटस अशी घ्या काळजी अन्यथ होणार कारवाई !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ । देशातील अनेक ठीकाणी होत असलेल्या धार्मिक भावना दुखावल्याबाबतच्या तक्रारी वाढत असतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक मोठा निर्णय देत तरुणाला दणका दिला आहे. व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवताना प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव बाळगणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले आणि व्हॉट्सअॅप स्टेटसमधून धार्मिक भावना दुखावणाऱ्या तरुणाला दणका दिला.

धार्मिक भावना दुखावणारे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील मोझरी येथील किशोर लांडकर (२७) याच्याविरुद्ध मंगरूळपीर पोलिसांनी भादंवि कलम २९५ – ए माहिती तंत्रज्ञान कायदा व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तो एफआयआर रद्द करण्यासाठी किशोरने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अंतिम सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने हे मत नोंदवत तो अर्ज फेटाळून लावला. व्हॉट्सअॅप स्टेटस हे ओळखीच्या लोकांसोबत संवाद साधण्याचे माध्यम आहे. ते मर्यादित लोकांपर्यंत सीमित असते, असे सांगून कोणीही आपली जबाबदारी टाळू शकत नाही, असेही न्यायालय निर्णयात म्हणाले. न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मीकी मेनेझेस यांनी हा निर्णय दिला. किशोर लांडकरने त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे गुगलवर विशिष्ट माहिती सर्च करण्याचे आवाहन केले होते. ती माहिती धार्मिक भावना दुखावणारी होती, अशी तक्रार गणेश भगत यांनी पोलिसांत नोंदविली

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम