राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर ; वीज कोसळून ४ ठार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ मार्च २०२३ । राज्यातील बदलत्या हवामानामुळे काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलाच कहर केला आहे. यामुळे अनेक शेतकरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव व मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारीही गारपीट, अवकाळी पावसाचा कहर सुरूच होता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यूू झाला. यात एका १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

गंगाखेड तालुक्यातील उखळी येथील बाळासाहेब बाबूराव फड (६०), परसराम गंगाराम फड(४०), साडेगाव (ता. परभणी) येथील आबाजी केशव नहातकर, शेळगाव (ता. सोनपेठ) येथील ओमकार भागवत शिंदे (१५) यांचा मृतात समावेश आहे. तर इतर चार जण वीज अंगावर पडल्याने जखमी झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणीसह साेयगावमध्येही वादळी पाऊस, गारपीट झाली. त्यामुळे वाघूर नदीला पूर आला होता. सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ते रखडले आहेत.

बांगलादेशात ताशी ४० किमी वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे ढकलले जात आहेत. दुसरीकडे राजस्थान व गुजरातच्या कच्छ भागावरही चक्रकार वारे वाहत आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून समुद्रावरील बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर स्थिरावल्याने महाराष्ट्रात गारपीट हाेत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या १२ वर्षापासून मार्च महिन्यात महाराष्ट्रात अशी स्थिती निर्माण हाेते. सध्या बाष्पयुक्त वारे ९ ते १२ किमी उंचावर ओढले गेलेत. त्या उंचीवरून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे मार्च महिन्यात गारपिटीची स्थिती ओढवत आहे. २०११ ते २०१४, २०१६, २०१८, २०१९ आणि २०२३ या काळात राज्यात गारपीट झाली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम