नवरा नसताना प्रेयसीला गेला भेटायला अन जीव गमावला

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ ऑक्टोबर २०२२ । प्रेम कधी कुणाच्या जीवावर बेतेल हे कधीच सांगू शकत नाही, प्रियकर व प्रेयसी ज्यावेळेस एकत्र येतात, त्यावेळेस ते कोणत्या स्तरावर जातील हे हि सांगू शकत नाही, अशातच एका प्रियकराला प्रेयसीला भेटणे खूपच महागात पडले आहे, ज्याच्याने त्या प्रियकराचा जीव गेला आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराला कधी जनतेच्या तावडीत सापडून तर कधी प्रेयसीच्या नातेवाईकांच्या हाती लागून पब्लिक मार पडतो… मात्र नाशिकमध्ये प्रेयसीला भेटायला गेलेल्या ३६ वर्षीय प्रियकराचा मृत्यू झाला असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाशिकच्या हिरावाडी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचे म्हसरूळ मधील एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबध होते. हे दोघंही एकमेकांवर जिवापार प्रेम करत होते. बऱ्याच दिवसांपासून त्याच प्रेम प्रकरण सुरु होते. प्रेयसीचा नवरा घरी नसताना प्रियकर तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जात असे. ७ ओक्टोबर रोजी नवरा घरी नसल्याने प्रियकर प्रेयसीला भेटण्यासाठी म्हसरूळ येथील तिच्या घरी गेला होता.

७ ओक्टोबर रोजी नवरा घरी नसल्याने प्रियकर आपल्या प्रेयसीलाभेटण्यासाठी थेट तिच्या घरी गेला होता. यावेळी दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र,त्याचवेळी अचानक घराची बेल वाजली आणि दारात बघितले तर प्रेयसीचा नवरा दिसला. आता आपले बिंग फुटेल या भीतीने दोघंही घाबरले होते. आपण पकडले जाऊ या भीतीने यासाठी प्रियकराने थेट घराच्या तिसर्या मजल्यावरून खिडकीतून खाली उडी मारली. मात्र यात प्रियकराला गंभीर दुखापत झाली होती. उपचारीकारिता त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर इजा असल्याने त्याचा मंगळवारी (१८ ऑक्टोबर) मृत्यू झाला असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम