
मंत्री म्हणून केलेले एक तरी काम दाखवा : राणे आदित्यवर आक्रमक
दै. बातमीदार । २२ ऑक्टोबर २०२२ । ठाकरे परिवारावर नेहमी टीका करण्यात आघाडीवर असलेले राणे परिवार कुठलीही संधी सोडत नाही, आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत हिन भाषेत टीका करताना दिसतात. मात्र आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नारायण राणेंना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेचा गट कुठं राहिला? शिवसेना ५६ वरून ५-६ वर आली आहे. त्यातील काहीजण माझ्या संपर्कात असल्याचं राणे यांनी म्हटलं होतं.
राणे यांच्या या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांना मागील १६ वर्षांची सवयच आहे. त्यांनी मंत्री म्हणून केलेलं एक तरी चांगलं काम दाखवाव. चार पक्षात जावून त्यांनी एकही काम केलं नाही. जाऊद्या राणे यांनी त्यांच्याकडे असलेल्या मंत्रीपदाचा किमान फुलफॉर्म सांगावा, असं थेट आव्हान आदित्य यांनी दिल आहे. दसरा मेळाव्यानंतर नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला होता. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही सातत्याने उध्दव ठाकरे कुटुंबावर हल्ला करत असतात.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम