
माजी मंत्री नवाब मलिकांची आज सुनावणी ; दिलासा मिळेल का ?
दै. बातमीदार । ९ जानेवारी २०२३ राज्यातील राष्ट्रवादीचे दोन नेते तुरुंगात अडकलेले होते, त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोर्टाचा दिलासा देत ते नुकतेच तुरुंगातून बाहेर आल्यावर महाविकास आघाडीने जल्लोषात स्वागत केले आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना दिलासा मिळालेला नाही. त्यांना जामीन मिळालेला नाही.
राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज त्यांनी जामीन मंजूर होणार की पुन्हा कोठडीत रवानगी होणार कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर त्यांना ही माजी गृहमंत्री देशमुखांप्रमाणे दिलासा मिळेल का कडेही राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यात इस्पितळात उपचार होत आहेत. याआधीही मलिकांचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला होता. मात्र आजच्या सुनावणीत त्यांना दिलासा मिळतो की, त्यांना पुन्हा कोठडी दिली जाते, याचा निर्णय होणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम