रुग्णालयांच्या अधिष्ठातांवर प्रचंड दबाव ; आदित्य ठाकरे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ ऑक्टोबर २०२३

राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांच्या अधिष्ठातांवर प्रचंड दबाव आहे, असे शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारी रुग्णालयात अनेक निरपराध रुग्णांचे बळी जाण्यावरून सरकारवर टीका करताना म्हटले आहे. राज्यातील प्रस्तावित प्रकल्प इतर राज्यांमध्ये गेल्यावरूनही त्यांनी पुन्हा टीका केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य यांनी शासकीय रुग्णालयांत रुग्णांचे बळी जात असताना सरकार मात्र राजकारणात मश्गुल असल्याचा टोलाही लगावला. राज्यात पालकमंत्री नियुक्ती पदावरून सरकारमधील मंत्री आणि आमदारांमध्ये वाद सुरू आहेत. परंतु त्यापलीकडे नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ठाणे यासारख्या जिल्ह्यांत सरकारी रुग्णालयांत अनेक निरपराध रुग्णांचे बळी गेल्याच्या गंभीर बाबीवर कोणीही बोलायला तयार नाही. खेकडे धरणफोडतात, असा दावा करणाऱ्या मंत्र्यांना हाफकीन दलाल वाटते. त्यामुळे हाफकीनसारख्या संस्थेला बाजूला ठेवत एक नवी समिती बनवली. मात्र यामुळे सुमारे ७०० ते ८०० कोटी रुपये वापराविना पडून आहेत. सायन आणि केईएम रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांच्या अधिष्ठातांवर प्रचंड दबाव आहे. सीएसआरमधून औषधे घ्या, आयव्ही फ्लूएडचे तुम्हीच बघा, एक्स-रे, सोनोग्राफी या सुविधांचे तुम्हीच बघा असे सांगितले जात असल्याचेही आदित्य म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम