राज्यात जोरदार पाऊस तर या भागात ऑरेंज अलर्ट जारी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जून २०२३ ।  राज्यात बदलत्या हवामानामुळे अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे तर काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे, तर काही जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणसह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यात चांगाल पाऊस सुरु झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळं शेती कामांना गती येणार आहे. तर काही भागात अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. पाहुयात राज्यात कुठे कुठे पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. काही भागात पावासामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. पावसामुळं वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतीच्या कामाला यामुळं वेग मिळणार आहे. पावसाच्या आगमनामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सून संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भात सक्रियपणे पुढे सरकत आहे. गोंदिया जिल्ह्यात पुढील दोन दिवस ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु राहणार आहे. सध्या पावसाची रिपरिप सुरु आहे. गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम