मुंडेंना ऑफर नंतर पंकजांचे मोठे वक्तव्य !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जून २०२३ ।  राज्यातील भारतीय जनता पार्टीत महिला नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली होती त्यानंतर त्यांना दोन पक्षांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर देखील दिली होती. त्यावर आता पंकजा मुंडे यांनी उलट त्या पक्षांना ऑफर दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. नेमकं काय म्हणाले मिटकरी? पंकजा मुंडे यांना वारंवार भारतीय जनता पार्टीकडून डावलं जात आहे.

मुंडे या पक्षावर नाराज आहेत. मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी त्यांची भेट घेतली होती. कारखाना निवडणुकीच्या निमित्तानं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकत्र आले. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांनी पक्षात यावं अशी माझी भावना आहे. पण त्याबाबत निर्णय पक्ष घेईल. बीआरएसने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. मात्र बीआरएस पक्ष ही अफूची गोळी आहे. मला खात्री आहे की पंकजा मुंडे या त्या पक्षात जाणार नाहीत, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर कारखान्याच्या निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकत्र आल्याचं पहायला मिळालं, आणि आता अमोल मिटकरी यांनी थेट पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम