देशातील ‘या’ भागात २४ तास राहणार मुसळधार पाऊस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जुलै २०२३ ।  देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. आयएमडीने येत्या 24 तासात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा ९% कमी पाऊस झाला आहे.

गुजरात आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. गुजरातमध्ये 301 मिमी (सामान्यपेक्षा 111% जास्त) आणि राजस्थानमध्ये 170 मिमी (सामान्यपेक्षा 142% जास्त) पाऊस पडला आहे. त्याचवेळी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे. तेलंगणामध्ये 71 मिमी (सामान्यपेक्षा 53% कमी) आणि आंध्र प्रदेशमध्ये 78 मिमी (सामान्यपेक्षा 26% कमी) पाऊस पडला.

दिल्लीतील खराब हवामानामुळे दिल्लीहून तीन उड्डाणे वळवण्यात आली. एक फ्लाइट लखनऊला आणि दोन फ्लाइट अमृतसर विमानतळावर पाठवण्यात आली. मुसळधार पावसामुळे गुरुग्राममध्ये रस्ते जलमय झाले आहेत. दुसरीकडे बिहारमध्ये नेपाळमधून पाणी येत असल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. बिहारमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे.
या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस : मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली, पंजाब, हरियाणा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, ओडिशा , छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. झारखंडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर पश्चिम राजस्थान, मराठवाड, बिहार आणि जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची शक्यता नाही. या राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम