त्याची उंची माझ्या शर्टच्या पहिल्या बटना एवढी : जगताप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ एप्रिल २०२३ ।  आपल्या वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे आमदार नितेश राणे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. यावेळी शहरात झालेल्या वादावरुन त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. हिंदुंवर अन्याय होत असेल तर सहन केला जाणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर संग्राम जगताप यांनी देखील राणे यांच्यावर टीका करत जशास तसे उत्तर दिलं आहे. त्यामुळे नगरमध्ये आज राणे विरुद्ध जगताप असा सामना पाहायला मिळाला.

अहमदनगर शहरात हिंदूंवर अन्याय होत आहे, त्यांची बाजू समजून घेण्यासाठी मी अहमदनगरला आलो असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. या वेळेस नितेश राणे यांनी ज्या ठिकाणी हिंदू-मुस्लीम भांडणांच्या घटना घडल्या होत्या, त्या ठिकाणी जाऊन पाहणे केली. यावेळेस त्यांनी स्थानिक लोकांना धीर देत पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या सर्व घटनांची माहिती आपण राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हिंदूंवर होत असलेले अन्याय आपण कदापिही सहन करणार नाही. यापुढे जशास तसे उत्तर देईल असेही राणे यांनी सांगितलं.

भाजप आमदार नितेश राणे आज अहमदनगर दौऱ्यावर होते. अहमदनगर शहरात एका विशिष्ट समाजाकडून हिंदू व्यापाऱ्यांवर हल्ले केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. तसेच स्थानिक आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार टीका केली. या सर्व प्रकाराला स्थानिक आमदार खतपाणी घालत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. त्याला संग्राम जगताप यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काही बाहेरचे आमदार शहरात येऊन म्हणतात की, स्थानिक आमदार माझ्या नजरेसमोरही उभा राहत नाही. त्याची उंची माझ्या शर्टच्या पहिल्या बटनाएवढी आहे, त्यामुळे अडचण आहे, असा टोला त्यांनी लगावला. स्वाभिमान विलीन केलेल्या या आमदारांनी नगरमध्ये येऊन आम्हाला आव्हान देऊ नये अन्यथा जसाच तसे उत्तर दिले जाईल असं आमदार जगताप म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम