खुद्द न्यायाधीश घेणार मुलाखत ; ८० हजार असेल वेतन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ एप्रिल २०२३ ।  देशात सुप्रीम कोर्ट म्हणजेच सर्वोच्च न्यायालय हे न्याय व्यवस्थेचं सर्वोच्च स्थान आहे. देशभरातील विविध प्रकारचे खटले सर्वोच्च न्यायालयात चालवले जातात. ही सर्व व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी या न्यायसंस्थेला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासते. त्यासाठी वेळोवेळी कर्मचारी भरती केली जाते. आताही सर्वोच्च न्यायालय अल्प-मुदत कराराच्या आधारावर लॉ क्लार्क-कम-रिसर्च असोसिएटची जागा भरण्यासाठी उमेदवार शोधत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, इच्छुक उमेदवाराचं किमान वय 20 वर्षांपेक्षा कमी नसावं तसंच कमाल वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावं.

इच्छुक उमेदवारांची निवड तीन टप्प्यांवर आधारित असेल. ‘स्टडी कॅफे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, निवडलेल्या उमेदवारांना 80 हजार रुपये मासिक वेतन दिलं जाईल. अर्जदारांना नोंदणीसाठी 500 शुल्क भरावं लागेल. इच्छुक उमेदवारांनी 30 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी संबंधित तपशीलांसह ऑनलाइन अर्ज भरावा.

पोस्टचं नाव: सर्वोच्च न्यायालयात अल्प-मुदत कराराच्या आधारावर लॉ क्लार्क-कम-रिसर्च असोसिएटची जागा रिक्त आहे. वयोमर्यादा: सर्वोच्च न्यायालयाच्या 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, इच्छुक उमेदवाराचं वय 20 ते 30 वर्षांदरम्यान असावं. शैक्षणिक पात्रता: – लॉ क्लार्क म्हणून नियुक्ती स्वीकारण्यापूर्वी इच्छुक उमेदवार हा कायद्याचा पदवीधर असला पाहिजे. कायद्याची ही पदवी (कायद्यातील एकात्मिक पदवी अभ्यासक्रमासह) भारतातील मान्यताप्राप्त कोणत्याही शाळा/कॉलेज/विद्यापीठ/संस्थेतून मिळवलेली पाहिजे. याशिवाय, बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे उमेदवाराची वकील म्हणून नावनोंदणी झालेली पाहिजे.
पाच वर्षांच्या एकात्मिक कायदा अभ्यासक्रमाच्या पाचव्या वर्षात किंवा कोणत्याही शाखेत पदवी घेतल्यानंतर तीन वर्षांच्या कायदा अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकणारा उमेदवारदेखील अर्ज करण्यास पात्र असेल.

लॉ क्लार्क-कम-रिसर्च असोसिएट म्हणून असाइनमेंट स्वीकारण्यापूर्वी संबंधित उमेदवारानं कायद्याची पात्रता संपादन केल्याचा पुरावा सादर केला पाहिजे. – उमेदवाराकडे संशोधन आणि विश्लेषणात्मक कौशल्ये, लेखन क्षमता आणि संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्याकडे ई-एससीआर, मनुपात्रा, एससीसी ऑनलाइन, लेक्सिसनेक्सिस, वेस्टलॉ, इत्यादी सारख्या विविध सर्ज इंजिन किंवा प्रक्रियांमधून इच्छित माहिती मिळवण्याचं कौशल्य पाहिजे.

वेतन: सर्वोच्च न्यायालयाच्या 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, निवडलेल्या उमेदवाराला 80 हजार रुपये मासिक वेतन दिलं जाईल. रजिस्ट्रेशन फी: उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं, अर्ज/चाचणी शुल्क आणि अधिक बँक शुल्क लागू असल्यास 500 रुपये भरावेत. इतर कोणत्याही स्वरूपात शुल्क स्वीकारलं जाणार नाही. कोणतेही पोस्टल अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. हे शुल्क यूको बँकेनं प्रदान केलेल्या पेमेंट गेटवेद्वारे भरलं पाहिजे. निवड प्रक्रिया: फेज I – बहुपर्यायी प्रश्न, कायदा समजून घेण्याची आणि लागू करण्याची उमेदवारांची क्षमता आणि आकलन कौशल्ये तपासणी फेज II – सब्जेक्टिव्ह लेखी परीक्षा, लेखन आणि विश्लेषणात्मक कौशल्यांची तपासणी फेज III – न्यायाधीशांद्वारे मुलाखत. अर्ज कसा करावा? सर्वोच्च न्यायालयाच्या 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, इच्छुक उमेदवारांनी 30 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी संबंधित तपशीलांसह ऑनलाइन अर्ज भरावा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम