..इतिहास बदलत नसतो ; फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जून २०२३ ।  राज्यातील राजकारणात भाजप व राष्ट्रवादीचे जोरदार वाक्ययुद्ध सुरु असतांना राज्याचे गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवारांनी केले तर मुसद्देगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी केले तर बेइमानी, असा सवाल फडणवीसांनी मविआला विचारताच त्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर देत फडणवीस तेव्हा प्राथमिक शाळेत होते, असे म्हणत टीका केली. याविषयाला देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी कुठेही पवारांना बेइमानी केली असे म्हटले नाही. ते भाजपसोबत आले हे मी लोकांना सांगितले. त्यामुळे मी प्राथमिक शाळेत होतो की, जन्माला यायचा होतो हे महत्त्वाचे नाही. पण इतिहास बदलत नाही. हे देखील तितकेच सत्य आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, पवार साहेब म्हणाले ते खरे आहे. 1977 मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. मी जे बोललो ते पवार साहेबांनी ऐकलेच नाही. किंवा त्यांनी माझ्या बोलण्याकडे बगल दिली असावी. मी काय म्हटलो, 1978 साली शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्यासोबत मंत्री होते. यांच्या सरकारमधील 40 आमदार फोडले. आणि भाजप सोबत सरकार स्थापन केले. आता शिंदेंनी देखील आमच्यासोबत निवडणूक लढवली आणि 40 आमदार सोबत घेऊन पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन केले. मग पवार साहेबांनी केली तेव्हा मुस्सद्देगिरी होऊ शकते आणि आता एकनाथ शिंदे यांनी केलेली बेइमानी कशी होऊ शकते, असा माझा सवाल होता.

मी कुठेही पवार साहेबांनी बेइमानी केली असे म्हटले नाही. ते भाजपसोबत आले हे मी लोकांना सांगितले. त्यामुळे मी प्राथमिक शाळेत होतो की, जन्माला यायचा होतो, पण इतिहास बदलत नाही, कुणी जन्माला आलं, नाही आलं. इतिहासात हे लिहून ठेवलेले आहे. की, शरद पवार यांच्या नेतृत्वात वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले, आणि तेव्हा भाजप म्हणजेच तेव्हाचे जनसंघासोबत सरकार स्थापन केले.

राष्ट्रवादीला दाखवण्यापुरते ओबीसी लागतात. पण पक्षात जेव्हा संवैधानिक पदे द्यायचे असतात तेव्हा त्यांना ओबीसी आठवत नाही. असा टोला फडणवीसांनी राष्ट्रवादीला लावला. राष्ट्रवादीतील नेत्यांच्या आपसातील चर्चांना मी फक्त उघडपणे व्यक्त केले आहे. त्यामुळे माझे बोलणे त्यांना ओबीसी नेत्याबाबतचे आवडले नसेल.
छत्रपती संभाजीमहाराजांचा छळ औरंगजेबाने केला होता. त्याचे कारण होते धर्म बदला, नतमस्तक व्हा, असे त्यांना सांगितले जात होते. पण त्यांनी मागणी मान्य केली नाही. त्यामुळे त्यांना प्राण दिले. अशा आदर्श राजाला मारणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक होणारे लोक म्हणजे प्रकाश आंबेडकर हे नवा इतिहास लिहणारे आहेत. ते नेहमीच नवा इतिहास लिहण्याचा प्रयत्न करतात, असा टोला फडणवीसांनी लगावला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम