अभिनेत्री दिशा पटनीला फटका : बिग बजेट सिनेमात पत्ता कट !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ नोव्हेबर २०२३

चित्रपट क्षेत्रात करिअरमध्ये एका सुपरहिट सिनेमाच्या प्रतीक्षेत असलेली अभिनेत्री दिशा पाटनीसाठी आगामी वर्ष महत्त्वाचे असून तिचे लवकरच ‘कल्की २८९८ एडी’, ‘योद्धा’ आणि ‘कंगुआ’ या तीन बिग बजेट सिनेमात ती झळकणार आहे.

मात्र, या चित्रपटांशिवाय ती आणखी एका बिग बजेट सिनेमात दिसणार होती ज्यातून तिचा पत्ता कट करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दिशाचा यंदा रिलीज होणारा ‘योद्धा’ सिनेमाही पोस्टपोन झाला आहे तर कल्कीच्या रिलीजबाबत काहीच हालचाल दिसत नाहीये. हे सगळे असताना दिशाच्या हातातून मोठ्या बॅनरचा सिनेमा निसटला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘कर्ण’ सिनेमात दिशाला फायनल करण्यात आले होते. मात्र, आता तिचा पत्ता कट करत राकेश मेहरा हे दाक्षिणात्य अभिनेत्री घेण्याच्या विचारात आहेत. यासाठी नयनताराच्या नावाची चर्चा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम