मी शांत बसल्यावर हि गडबड सुरू आहे : मनोज पाटलांची जोरदार टीका !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४  नोव्हेबर २०२३

ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आता टोळी मुकादमाला घरी बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. म्हातारा झाला तरी त्याची खूप गडबड सुरू आहे, असे ते शेवगाव येथील सभेत बोलताना म्हणालेत. जरांगेंनी लवकरच मराठवाडा, खान्देश व विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही सूतोवाच केले आहे.

मनोज जरांगे यांची गुरुवारी अहमदनगरच्या शेवगाव येथे सभा झाली. त्यात त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली. ओबीसी जनतेला वाटते की, पुरावे मिळाले असतील तर मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. आपल्या नेत्यांनी गप्प बसले पाहिजे. पण हा किती खातो? याला पुरेनाच. अरे किती खातो? अनेक दिवसांपासून एकटाच खात आहे. हा मुकादम चांगला नाही, त्याला घरी बसवणार आहे, असे जरांगे म्हणाले. मी 20-25 दिवस शांत बसलो होतो. पण तो अंबडच्या सभेत बोलला. वय झाल्यामुळे माणसाला काही पचत नाही. त्याला खायची सवय लागली आहे. त्याने महाराष्ट्र सदन व जनतेचा पैसा सगळा ओरबाडून खाल्ला आहे, असेही जरांगे यावेळी भुजबळांवरील हल्ल्याची धार अधिक धारदार करताना म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम