गृहकर्ज माफ करायचे ; वाचा सविस्तर बातमी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० फेब्रुवारी २०२३ । देशात नुकताच अर्थसंकल्प झालेला आहे. यात सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असलेले घर घेतलेले आहे. पण यंदाच्या अर्थसंकल्पात रेपो दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना हि वाढ पेलणारी नाही, यासाठी अनेक नागरिकांनी देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांना निवेदन केले आहे.

त्यात म्हटले आहे कि, आपणाकडे सर्वसामान्य जनताच्या वतीने मागणी करीत आहोत कि,मध्यमवर्गीय सामान्य व्यक्ती आपल्याला हक्काचे घर असावे म्हणुन काबाडकष्ट करून शिवाय आवश्यक तेवढे इन्कम नसतांनाही (कारण त्याशिवाय बँक कर्ज देत नाही म्हणून) इन्कमटेक्स दाखवुन बॅंकेकडून कर्ज घेते परंतु त्याच मध्यमवर्गीय व्यक्तीला शासनानेतर्फे कोणतीही सुविधा किंवा मदत न होता नेहमी रेपो दर वाढवून व्याज व हप्पे वाढवले जात आहेत हे अन्यायकारक आहे.सरकार ज्यांच्याकडे घर,गाड्या,शेती आहे अश्या लोकांनाही मोफत अन्यधान्य वाटत आहे.खऱ्या गरजवंताला अवश्य दिले पाहिजे परंतु सरसकट काही योजनांचा गैरवापर होतांना दिसत आहे.मात्र केवळ राजकारण म्हणुन अश्याकडे दुर्लक्ष केले जात आहे हे योग्य नाही. काही लोकांना दिवाळखोर घोषित करून अनेक धडदांडगे यांना व्याज व कर्ज माफ केले जात आहे. गेले 2 वर्ष करोनामुळे विस्कटीत झालेले जीवन थोडे प्रमाणात सुधरत असतांना व्याजदरात वाढ करून सामान्य मध्यमवर्गीय जनतेचे जिवन जगणे मुश्कील केले जात आहे. ज्या मध्यमवर्गीय व्यक्तींनी गृहकर्ज घेतले आहे त्यांना प्रथम घराकरता तरी व्याज माफी द्यावी किंवा ज्या वेळी कर्ज घेतले आहे तेच व्याजदर कायम असावे.रेपोदरचा त्यावर परिमाण होणार नाही असे काहीतरी घोरण जाहीर करावे.टेक्स भरणारे व्यक्तींना त्यांच्या करता जीवन सुकर व्हावे म्हणुन शासनाची जबाबदारी आहे आपण या मागणीवर गंभीरपणे विचार करावा व मध्यमवर्गीय व्यक्तीला न्याय द्यावा हीच. अन्यथा जनआंदोलन उभारावे लागेल याची नोंद घ्यावी ही विनंती यामध्ये धुळे येथील दिनेश विभांडीक यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम