आजचे राशिभविष्य दि १० फेब्रुवारी २०२३

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० फेब्रुवारी २०२३ । मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांसाठीही आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला नोकरीत मोठा नफा मिळू शकतो. जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना व्यवसाय करताना भागीदारीत फायदा होईल. बदलत्या हवामानामुळे आरोग्य बिघडू शकते, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुमच्यासाठी चांगले राहिल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना लोकांना रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत.

वृषभ – वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी आहे. तुमच्या प्रतिष्ठेत आज वाढ होईल. नोकरदारांना त्यांचे रखडलेले पैसे आज मिळू शकतात. आज तुम्ही नवीन वस्तू खरेदी करु शकता. वरिष्ठांच्या आशीर्वादाने नवीन काम सुरु करु शकाल. ज्या तरुणांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

मिथुन – व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी सध्याचा काळ अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात काही धोरणे आणि नियमांचे पालन करावे, अन्यथा मोठा गोंधळ होऊ शकतो. आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करु शकता. मित्रांचे सहकार्य मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

कर्क – कर्क राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. घरबांधणीच्या क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही नवीन वाहन खरेदी करु शकता. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना सुरू करण्यात व्यस्त राहतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

सिंह – सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी करणारांना नवीन जबाबदारी मिळेल. तुमच्या पदातही वाढ होईल. रिअल इस्टेट व्यवसायासाठी वेळ शुभ आहे. जे लोक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. कलात्मक क्षेत्रात वाढ होईल.

कन्या – कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील त्यांच्या रखडलेल्या योजना सुरु करण्यात व्यस्त राहतील. नोकरीसाठी ही वेळ लाभदायक आहे. ज्या तरुणांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना आज यश मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना रोजगार मिळू शकतो.

तूळ – जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यांना आज अपेक्षित नफा मिळेल, ज्यामुळे ते आपली आर्थिक स्थिती मजबूत करु शकतील. आज तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्धही खर्च करावा लागेल. घराच्या सजावटीसाठीही काही खरेदी करावी लागेल. नोकरीत बदल संभवतो, तुमच्या पदात वाढ होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.

वृश्चिक – राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र कुठल्यातरी धार्मिक स्थळाच्या यात्रेला जातील. कुटुंबात सुरु असलेल्या समस्या एकत्र बसून सोडवल्या तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले होईल. तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. व्यवसाय करणारे लोक व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करतील

धनु – व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. नोकरीत प्रगतीची चिन्हे आहेत. तुम्हाला आज आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या घरी नवीन वाहन आणू शकता. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी हा काळ चांगला आहे.

मकर – पैशाच्या बाबतीत उद्याचा दिवस चांगला जाईल. तुमच्या चुकांमधून शिकण्याची गरज आहे. आजचा दिवस कष्टकरी लोकांसाठी खास असणार नाही. नोकरीत कोणताही निर्णय घेताना संभ्रमात राहाल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक प्रगती होईल. कुटुंबाच्या भल्यासाठी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. परंतु काही लोक यामुळे नाराज दिसतील. ज्येष्ठांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठिशी असतील.

कुंभ – राजकारणात काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फायद्याचा असेल. व्यवसायात नवीन कामे सुरु होतील. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागेल. आज आत्मविश्‍वास वाढेल. तुमची रखडलेली कामेपूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

मीन – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप आनंददायी असणार आहे. आज तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल. शारीरिक त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. भावाच्या लग्नात येणारे अडथळे दूर होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम