आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२

मेष :-
आळस करणे सोडून कामाला लागा. प्रत्येक योजना बिनदिक्कत यशस्वी झाल्याचा आनंद मिळेल. लांबणीवर पडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासातून फायदा संभवतो. सहकार्‍यांशी मतभेद होईल.

वृषभ :-
आवडीचे चमचमीत पदार्थ खाल. दिवस मध्यम फलदायी. संसारोपयोगी वस्तू खरेदी कराल. घरातील वातावरण आनंदी राहील.

मिथुन :-
फसवणुकीपासून सावध आणि सतर्क रहा. एखादी घटना मन निराश करू शकते. सत्कर्माचे पुण्य मिळेल. दिवसभर कामाची धावपळ राहील.

कर्क :-
दिवसाचा बराचसा वेळ मजेत जाईल. ग्रहांची अनुकूल स्थिती फलदायक ठरेल. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. थकवा नाहीसा होईल.

सिंह :-
साधे आणि सरळ जीवन जगाल. नेहमी आशावादी राहा. महत्त्वाच्या कामाच्या नोंदी तपासून पाहणे गरजेचे. नियोजित कामे पूर्ण होतील. संमिश्र घटनांचा दिवस.

कन्या :-
इतरांना साहाय्य कराल. लोक तुमचा सल्ल्यावर विचारविनिमय करतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. दूरच्या नातेवाईकांची खुशाली समजेल. जुने मित्र भेटतील.

तूळ :-
तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडण्याबरोबरच तुमचा आत्मविश्वास वाढेल. लोक तुमच्याकडे प्रभावित होऊन आकर्षित होतील. झोपेची समस्या जाणवेल. नातेवाईकांमध्ये एकी जपा.

वृश्चिक :-
रागराग, चिडचिड करू नये. संयमाने, धीराने काम करावे. मुलांसोबत दंगामस्ती करण्यात व करमणुकीत अधिक वेळ घालवाल. कामाच्या बाबतीत सजग राहावे.

धनु :-
सरकारी कामे वेळखाऊ ठरतील. नवीन मित्र बनतील. एखादा चांगला अनुभव अनुभवायला मिळेल.

मकर :-
जुन्या गोष्टींची उदासीनता बाळगू नका. जवळचा प्रवास होण्याची शक्यता. कौटुंबिक वादविवाद टाळावेत. कामाचे नवीन धोरण आखावे. काटकसरीपणा अंगी बाळगणे आवश्यक.

कुंभ :-
आवडी-निवडी बाबत सजग राहाल. जोडीदाराचे हट्ट पूर्ण होतील. घरातील वातावरण प्रसन्न राहील. भागीदारीतून फायदा होईल. मनाची चंचलता जाणवेल.

मीन :-
आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील. बोलतांना शब्दांचे वजन ध्यानात घ्या. आजचा दिवस उत्तम फलदायी असून, दिवस मनाप्रमाणे घालवाल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम