चिमुकल्या मुलींना अवघ्या पाचशे रुपयांना विकले; पोलिसांत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्तिथीचा गैरफायदा घेत एक मेंढपाळाने दोन अल्पवयीन मुलींना पाचशे रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार जव्हारच्या धारणहट्टी भागात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा भोये (वय ८) व काळू भोये (वय ६) अशी या दोघा मुलींची नावे आहेत. दोन्ही चिमुकल्या एका मेंढपाळाकडे घरातील कामे, मेंढ्यांची स्वच्छता व त्यांना चरायला घेऊन जाणे इत्यादी कामे करीत होत्या.

या कामांचा मोबदला म्हणून संबंधित मेंढपाळाने मुलींच्या कुटुंबास वर्षाला बारा हजार रुपये व एक मेंढी देण्याचे आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्षात वर्षाला फक्त पाचशे रुपये दिले जात असल्याची बाब निदर्शनास आल्याने, एका श्रमजीवी संघटनेने या घटनेची दखल घेतली.

दरम्यान, सदर मेंढपाळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांना मनीषा भोये सापडली, परंतु त्यांच्याकडून काळू भोयेचा शोध घेतला जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम