
व्हाट्सएपद्वारे होणार फास्टॅग रिचार्ज; कसे ते वाचा
दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । जर तुम्हीही कार किंवा इतर वाहन चालवत असाल तर तुम्हाला हे माहित असेलच की, वाहनांसाठी फास्टॅग हा किती महत्त्वाचा आहे. विना फास्टॅग टोलनाका पार केला तर दुप्पट टोल भरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी फास्टॅग रिचार्ज करणे ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे.
म्हणून तुमचा हा ताण दूर करण्यासाठी आणि फास्टॅग रिचार्ज सुलभ करण्यासाठी आयडीएफसी बँकेने व्हाट्सएपच्या माध्यमातून फास्टॅग रिचार्जची सुविधा सुरू केली आहे.
यामुळे आपण कोणत्याही थर्ड-पार्टी एप किंवा नेटबँकिंगमध्ये लॉग इन न करता, फक्त व्हाट्सएप वर संदेश पाठवून तुमचा फास्टॅग त्वरित रिचार्ज करू शकाल.
व्हाट्सएप द्वारे फास्टॅग कसे रिचार्ज कराल?
१. सर्वप्रथम हा क्रमांक +919555555555 फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. हा आयडीएफसी फर्स्ट बँकेचा व्हाट्सएप चॅटबॉट नंबर आहे.
२. फोनमध्ये नंबर सेव्ह केल्यानंतर त्यावर ‘हाय’ टाइप करून पाठवा व रिचार्जचा पर्याय निवडा.
३. रिचार्जचा पर्याय निवडल्यानंतर रिचार्ज करण्यासाठीची इच्छित रक्कम एंटर करा.
४. यानंतर, तुम्हाला ओटीपीद्वारे हा व्यवहार सत्यापित करावा लागेल.
५. हे केल्यावर व्यवहार पूर्ण झाल्याचा संदेश येईल व रिचार्ज पूर्ण होईल.
येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या ह्या सुविधेचा लाभ फक्त आयडीएफसी फर्स्ट बँकेचे खातेधारक व फास्टॅग असलेले वापरकर्तेच करू शकतील. याकरिता त्यांनी वर लिहिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो कराव्यात.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम