मंत्रिमंडळाच्या बैठकीतील इतर निर्णयांसोबत ‘हे’ निर्णय दिलासादायक

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक प्रकारच्या घोषणा व धडाधड निर्णय घेण्याची मालिका सुरूच आहे. अशातच आज बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आलेले आहेत.

या बैठकीत घेण्यात आलेले महत्वपूर्ण व संक्षिप्त निर्णय म्हणजे :-

१) भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणार.

२) पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाच्या कामकाजास २८ सप्टेंबरपासून सुरुवात.

३) राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीची स्थापना करणार. जेणेकरून शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण होईल.

४) पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा (कॅज्युअल लीव्ह) १२ पासून २० वाढविण्यात आल्या.

५) सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमणे.

६) नाशिक येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहासाठी भाडेतत्त्वावर जागा देणार.

७) वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वेमार्गाच्या कामाला गती देणार. सुधारित खर्च आणि राज्यशासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता.

८) कांदा अनुदान योजनेत बार्शी येथील लक्ष्मी सोपान ऍग्रीकल्चर मार्केटिंग कंपनी या खाजगी बाजार समितीचा समावेश.

९) औसा येथे दिवाणी न्यायाधीश न्यायालय स्थापन करून पदनिर्मितीला चालना देणार.

१०) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यातील वर्ग तीन मधील लिपिकांची सर्व रिक्त पदे भरणार.

११) आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रकरणांची चर्चा व तात्काळ निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन.

१२) धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा मागवून तसेच प्रकल्पाला जादाच्या सवलती देऊन त्याच्या अंमलबजावणीसाठी मान्यता.

दरम्यान, या सर्व निर्णयांपैकी पोलिसांच्या नैमित्तिक रजा वाढविणे व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत वर्ग तीन ची लिपिक पदे भरण्याच्या निर्णयामुळे पोलिसांना व नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना दिलासा मिळणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम