अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्थापना दिवस उत्साहात साजरा
अमळनेर (आबिद शेख)-अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे ग्राहक तीर्थ मा.बिंदू माधव जोशी व प. पूज्य स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमापूजन करण्यात आले व सदस्यता नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. साधारण दहा सदस्यांनी वार्षिक सदस्यता नोंदणी केली. याप्रसंगी जिल्हा निरीक्षक मकसूद बोहरी यांनी ६ सप्टेंबर १९७४ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना बिंदू माधव जोशी यांनी पुणे येथे केली. २३-२- १९७५ ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मान. एम.सी.छागला यांच्या प्रमुख व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले होते . ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व्हावे व ग्राहक संरक्षण कायदा करण्यात यावा यासाठी बिंदू माधव जोशी यांनी अथक प्रयत्न केले . तत्कालीन पंतप्रधान मान. स्व. राजीव गांधी यांना भेटून त्यांनी ग्राहकांचे हिताचे महत्त्व विशद केले. मान. राजीवजींनी फार आनंद व्यक्त केला व म्हणाले की आपने बहुत ही बुनियादी प्रस्ताव लाया है! सदर प्रस्तावावर आम्ही लवकरच कायदा करू असे आश्वासन दिले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन भारत सरकारने २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा संसदेत बहुमताने मंजूर केला व लगेच त्यावर राष्ट्रपतींनी सही केली व तो कायदा अमलात आला.
सदर या कार्यक्रमास जिल्हा बँकिंग व सायबर प्रमुख विजय शुक्ल, श्रीमती विमलाबाई मैराळे, मेहराज हुसेन, खदीर सादिक, ताहा बुकवाला ,आमंत्रित श्रीमती अरवाबेन सादिक आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीते साठी मोहसीन शेख व गणेश बडगुजर यांनी विशेष प्रयत्न केले.अशी बातमी पी.आर.ओ.जयंतीलाल वानखेडे यांनी दिली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम