आजचे राशीभविष्य, गुरुवार ८ सप्टेंबर २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 08 सप्टेंबर 2022 | मेष – शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील. गरजूंना मदत कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. भावंडांशी नाते दृढ होईल.

वृषभ – कर्ज व्यवहार टाळावेत. व्यवसाय विस्ताराचा विचार कराल. कामात क्षुल्लक समस्या येऊ शकतात.

मिथुन – जुन्या प्रश्नांची उकल होईल. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. हित शत्रूंच्या कारवाया वाढतील.

कर्क – वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांची गाठ पडेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील.

सिंह – आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात. आत्मविश्वास वाढीस लागेल. झालेल्या लाभाची वाच्छता करू नये.

कन्या – जुनी समस्या संपुष्टात येईल. प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल.

तूळ – कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा. कर्जाचे व्यवहार टाळावेत. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे.

वृश्चिक – गोड बोलून कामे करून घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नियोजन व कौशल्य पणाला लागू शकते. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका.

धनू – मोठ्या वस्तूंची खरेदी होईल. अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल. पालकांच्या सल्ल्यानेच कामे करावीत. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

मकर – विद्यार्थ्यांनी चिकाटी सोडू नये. लाभ पदरात पडून घ्यायला धावपळ होईल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. मानसिक तणाव निवळतील.

कुंभ – एकाच वेळी अनेक कामे सामोरी येतील. जुनी कामे मार्गी लागतील. प्रवास जपून करावा. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या.

मीन – खाण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. विवाह इच्छुकांना पुढील बोलणीसाठी अनुकूल दिवस.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम