मृत पत्नीसोबत पतीचा रेल्वेप्रवास; कारण वाचून बसेल हादरा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । रेल्वे प्रवासादरम्यान बऱ्याचशा प्रवाशांसोबत अनेक प्रकारच्या अप्रिय घटना घडत असतात. पण बिहारमध्ये एका व्यक्तीसोबत जी घटना घडली, ती वाचून तुम्हाला नक्कीच हादरा बसेल. या घटनेत एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या मृतदेहासोबत ५०० किमीपर्यंतचा प्रवास केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार येथील औरंगाबाद जिल्ह्यात राहणारा नवीन हा त्याची पत्नी उर्मिला हिस उपचारार्थ लुधियाना घेऊन गेला व नंतर लुधियानाहून पुन्हा बिहारच्या ट्रेनमध्ये चढला. ट्रेन सुरू होताच उर्मिलाची प्रकृती बिघडली आणि प्रवासातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जर या प्रकाराची माहिती कोणाला मिळाली असता, तर त्याला इतर प्रवास व यामुळे होणारा खर्च परवडण्याजोगा नसता, म्हणून नवीनने मयत उर्मिलाचे तोंड ओढणीने झाकले व तिच्या मृतदेहाला मांडीवर घेऊन प्रवास केला.

मात्र, प्रवासात एकास संशय आल्याने त्याने ताबडतोब ही माहिती जीआरपीला दिली. यानंतर शहाजहानपूर येथे गाडी पोहोचताच पोलिसांनी या तरुणाच्या मृत पत्नीचा मृतदेह ट्रेनबाहेर काढत शवविच्छेदनासाठी रवाना केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम