माणूस बनला सैतान; कुत्र्यासोबत केले क्रूर कृत्य

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । मागील काही दिवसांपासून कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटनेत वाढ होत असताना, हा व्हिडीओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल आणि तुम्हीही म्हणाल, माणसापेक्षा मुकी जनावरे बरी!

सध्या ट्विटरवर मुक्या प्राण्यांचा छळ करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यात एका कुत्र्याला दोरीच्या साहाय्याने बांधून भरधाव गाडीने फरफटत रस्त्यावर नेले जात असल्याने हा निष्पाप कुत्रा खेचला जात आहे.

एका दुचाकीस्वाराने या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण केले होते. हा व्हिडीओ कुठला आहे, हे अद्याप समोर आलेले नाही आहे. परंतु अनेक नेटकऱ्यांनी या संबंधित क्रूरकर्मांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.

कुत्र्यांना जरी हल्ला करण्याचे गांभीर्य लक्षात नसले, तरी सैतानप्रमाणे वागणाऱ्या अशा क्रूर माणसांचे काय करावे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम