चुका करण्याचं माझं वयच आहे ; सारा अली खान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ मार्च २०२३ । ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. एका मुलाखतीत सारा तिच्या करिअरविषयी आणि या प्रवासात केलेल्या चुकांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. साराच्या काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. अशा चित्रपटांवरही तिने प्रतिक्रिया दिली. चुका करण्याचं माझं वयच आहे, असं म्हणत असतानात त्यातून शिकायला मिळत असल्याचंही साराने मान्य केलं.

“एक अभिनेत्री म्हणून मला दररोज भरपूर काही शिकायला मिळतं आणि हाच प्रवास माझ्या प्रगतीसाठी उपयोगी आहे. मी नेहमीच अशा गोष्टींमधून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. पण मीसुद्धा काही चुका केल्या आहेत, हे मान्य करते. मी असे काही चित्रपट केले आहेत, ज्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण तरी, चुका करण्याचं हे माझं वय आहे. पुन्हा जोमाने उभं राहण्यासाठी खाली पडणंही तितकंच महत्त्वाचं असतं”, असं सारा या मुलाखतीत म्हणाली. चुकांविषयी बोलताना ती पुढे म्हणाली, “चुका करणे हा माझ्या प्रवासाचा एक भाग आहे, हे मी शिकले आहे.”

2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. यामध्ये तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर ती रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटात झळकली. साराच्या करिअरमधील हे पहिले दोन चित्रपट यशस्वी ठरले. मात्र इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’ आणि ‘कुली नंबर 1’ या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

सध्या साराच्या हाती बरेच प्रोजेक्ट्स आहेत. लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटात ती अभिनेता विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय विक्रांत मेस्सीसोबत ‘गॅसलाईट’ चित्रपटात ती झळकणार आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित ‘मर्डर मुबारक’, ‘ऐ वतन मेरे वतन’ आणि अनुराग बासू दिग्दर्शित ‘मेट्रो… इन दिनों’ या चित्रपटांची ऑफर तिच्याकडे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम