फडणवीस यांच्याविषयी सहानुभूती वाटते : खा.सुळे यांचा थेट आरोप !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ नोव्हेबर २०२३

देशातील भाजपचे नेते राज्यातील काही नेत्यांना कमकुवत करीत असल्याचा आरोप राज्यातील शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे यांनी आज भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

खा.सुळे म्हणाले कि, दिल्लीतील अदृश्य शक्ती महाराष्ट्राला कमकुवत करण्याचे काम करत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी या सर्वांना कमकुवत करण्याचे काम ही अदृश्य शक्ती करत आहे, असा आरोप देखील त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. मला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सहानुभूती वाटते आहे. कारण दिल्लीतल्या अदृश्य शक्ती महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी या सर्वांना कमकुवत कसे करता येईल हे पाहिले जात आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी हवेत हा आरोप करत नाही. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. मी हे सिद्धही करु शकते. दिल्लीत बसलेल्या या ‘अदृश्य शक्ती’मुळे मराठी माणूस, महाराष्ट्रातला हिरे व्यापार, गुंतवणूक, रोजगार एवढेच काय क्रिकेट सामनेही पळवले जात आहे. महाराष्ट्राचे म्हणून जे जे काही आहे, ते सर्व त्यांना कमकुवत करायचे आहेत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम