पिक्चर अभी बाकी है…खा.राऊतांनी केले ट्विट

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ नोव्हेबर २०२३

राज्यातील ठाकरेंच्या शिवसेनेत व भाजपात गेल्या काही महिन्यापासून होत असलेल्या टीका टिपण्णीवर पुन्हा एकदा खा.संजय राऊत यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडीओ व्हायरल केल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कसिनोमधील फोटो ट्विट केल्यानंतर संजय राऊत यांनी आता एक व्हिडिओच जारी केला आहे. ‘An Evening in Macau.. मकाऊ की रातें.. पिक्चर अभी बाकी है..’ अशा टॅगलाईनसह संजय राऊतांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. याआधी संजय राऊतांनी बावनकुळेंचा जो फोटो ट्विट केला होता, त्याच कसिनोमधील हा व्हिडिओ दिसत आहे. त्यामुळे मकाऊमधील या कसिनोचे माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडिओ असल्याचा दावा करणाऱ्या संजय राऊतांनी पुन्हा एकदा बावनकुळेंवर जोरदार निशाणा साधल्याचे दिसत आहे. त्याला चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संजय राऊतांनी केलेले ट्विट.

 

संजय राऊत यांनी सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट केला. त्यात बावनकुळे कथितपणे जुगार खेळताना दिसून येत आहेत. अवघा महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊ येथील कॅसिनोत जुगार खेळत आहेत, अशी टीका राऊतांनी केली होती. राऊत म्हणाले होते, महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…

बावनकुळेंचा फोटो ट्विट केल्यानंतर संजय राऊतांनी बावनकुळेंवर जोरदार निशाणा साधला होता. संजय राऊत यांनी आपल्या अन्य एका ट्विटमध्ये बावनकुळेंवर जुगारमध्ये तब्बल 3.50 कोटी रुपये उडवल्याचा आरोप केला. ते म्हणाले होते की, 19 नोव्हेंबर… मध्यरात्री… मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन… साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम