नंदीबैल तुमच्याकडेच सोडून आलोय ; ठाकरेंच्या टीकेवर शिंदे गटाचे उत्तर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ११ ऑक्टोबर २०२३

राज्यातील शिवसेनेच्या दोन्ही गटात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतांना आता शिंदे गटाच्या महिला नेत्याने ठाकरे गटाला सुनावले आहे. नंदीबैलालाही कुणी विचारलं की, भाजपचे सरकार येणार का? तर तोही सांगेल नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं.

 

Sheetal Mhatre criticize Uddhav Thackeray

 

नंदीबैलांना विचारुन राजकारण करण्याची आमची रीत नाही. आमच्या मनगटात ताकद आहे आणि सोबत बाळासाहेबांचा विचार आहेत. काहीही म्हटलं तर त्याला मान डोलावणारे नंदीबैल आम्ही तुमच्याकडेच सोडून आलो आहोत, असा टोला शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. त्याचबरोबर आमच्याकडे आता आलेल्यांना शिंगावर घेणारे सच्चे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांची दिलदारपणाची, मैत्री निभावण्याची आणि मनात असेल ते स्पष्ट सांगून टाकण्याची परंपरा या पुत्रप्रेमाने अंधत्व आलेल्या उद्ध्वस्त सेनेच्या धृतराष्ट्राने कधीच मोडीत काढली आहे. आता यांची संस्कृती आहे ती आतल्या गाठीची!!! पोटात एक आणि ओठात एक ठेवायची!! अशी टीकाही शीतल म्हात्रे यांनी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम