‘त्या’ जमिनीशी माझा संबध नाही ; अजित पवार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ ऑक्टोबर २०२३

पुण्यातील येरवड्यातील भूखंडावरून माझ्यावर टीका करण्यात आली, परंतु या जमीन प्रकरणाशी माझा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. जागा देण्याची आणि पुन्हा करार रद्द करण्याची सर्व प्रक्रिया गृह विभागाच्या अखत्यारितील समितीने केली आहे. त्यामुळे माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. वास्तविक सत्यपाल सिंग यांनी आग्रहाने मंजूर केलेला प्रकल्प मीरा बोरवणकर यांना मान्य नव्हता, त्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला, असा पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या ‘मॅडम कमिशनर’ या आत्मचरित्रात येरवड्यातील मोक्याचा भूखंड खासगी बिल्डरला देण्यासाठी पोलिसांच्या घराचा आणि पोलीस ठाण्याचा प्रकल्प रद्द केल्याचा आरोप केला होता. यामध्ये एका दादा पालकमंत्र्यांच्या आग्रहामुळे हा प्रकल्प रद्द झाल्याचाही आरोप केला. यावरून विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन पवार यांनी चौकशी करावी, असे आव्हान देखील केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम