मी त्याला अनफॉलो केले ; चारू असोपा आणि राजीव सेन पुन्हा भिडले

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ ।  टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी संपताना दिसत नाहीत. आता दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. एवढेच नाही तर राजीवने नुकतेच शेअर केलेले सर्व फॅमिली फोटोही त्याच्या अकाउंटवरून डिलीट केले आहेत. याविषयी चारुनेही एका मुलाखतीत बोलल्याचं दिसून आलं.

चारूने उघड केलं की खरं तर राजीवनेच तिला ब्लॉक केले आहे. ‘मी त्याला अनफॉलो केले नाही, त्याने मला ब्लॉक केले. तो दिल्लीला गेला आहे आणि तिथे गेल्यावर त्यानं मला ब्लॉक केलं आहे. तो काय करत आहे कुठे आहे मला काही कळत नाहीये’, असं चारू म्हणाली.

13 ऑक्टोबरला करवा चौथच्या दुसऱ्या दिवशी दोघांनी हे केले. अशा स्थितीत या दोघांमध्ये काही प्रमाणात तेढ निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांनीही त्यांच्या नात्याला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतल्यावर काही फोटो शेअर केले होते. आता तेही फोटो त्यांनी सोशल मीडियावरुन हटवले आहेत. त्यांच्या पॅचअप-ब्रेकअपला चाहतेही कंटाळले असून दोघांविषयी चिंता व्यक्त करत आहेत. दरम्यान, राजीव सेन आणि चारू असोपा यांनी 2019 मध्ये लग्न केले होते. दोघांना एक मुलगी आहे. लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. त्यामुळे आता दोघे फायनल काय निर्णय घेणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम