हे टीव्ही कलाकार येणार मोठ्या पडद्यावर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ ऑक्टोबर २०२२ ।  जर अभिनय दमदार असला तर चित्रपट मिळालाच पाहिजे असा कोणत्याही अभिनेत्याचा दावा नसतो, पंरतु खऱ्या कलाकाराला टेलिव्हिजन या छोट्याशा माध्यमांपासूनच सुरुवात करावी लागते. व त्या माध्यमातून तो अभिनेता घरो घरी पोहचत असतोय, मात्र, अशा मोठ्या इंडस्ट्रीमध्ये टिकूण राहणे फारच कठीण असते. आज आपण अशाच कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत जे टीव्ही कलाकार चित्रपटामध्ये पदर्पण करणार आहेत.

जॅस्मिन भसीन ; अभिनेत्री जॅस्मिन भसीन ही टीव्ही क्षेतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. हिने अनेक मालिकांमध्ये आपली छाप सोडली आहे. तिने नुकतंच ‘हनीमून’ चित्रपटातून पंजाब इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून ती पंजाबचा गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवाल याच्यासोबत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट कौटुंबिक कॉमेडी चित्रपट आहे, जो 25 ऑक्टोंबर दिवशी चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी जॅस्मिन पंजाबी गाण्यामध्ये दिसली होती.

जन्नत जुबेर लहान वयातच ‘फुलवा’ आणि ‘आशिकी’ सारख्या मालिकांमध्ये आपली छाप सोडणारी अभिनेत्री जन्नत जुबेर हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने आपल्या दमदार अभिनयाने टीव्ही क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आता तिला मालिकामध्ये नाही, तर मोठ्या पडद्यावर काम करायचंय. आता ही अभिनेत्री लवकरच पंजाबी ‘कुलचे छोले’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. यामध्ये दिलराज ग्रेवाल मुख्य भुमिकेत दिसणार असून हा चित्रपट 11 नेव्हेंबर दिवशी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

धीरज धूपर ; कुंडली भाग्य मालिकामधून करण नावाच्या भुमिकेने प्रसिद्ध अणारा धीरज धूपर हा देखिल पंजाबी इंडस्ट्रीमझध्ये आपले नशीब चमकवण्याचा प्रयत्न करत आहे. माध्यमातील वृत्तानुसार धीरज लवरच पंजाबच्या बिग बजेट चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाची शूटिंग पंजाब आणि अमेरिकामध्ये होण्याची शक्यता आहे.

सरगुन मेहता : पंजाबी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री सरगुन मेहता टीव्ही अभिनेता रवी दुबे याची पत्नी आहे. ती ’12/24 करोल बाग’ या मालिकाने अमाप प्रसिद्धी मिळवली. तिने पंजाबमध्ये अनेक चित्रपट, गाण्यांच्या व्हिडिओमध्ये काम केले आहे. आता सगरुन ‘कठपुतली’ या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम