स्टॅम्प पेपरवर मी लिहून देतो ; अजित पवारांची पत्रकार परिषद !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ मे २०२३ ।  राज्यात गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीत फुट पडत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहे. त्यावर राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांची ईडीकडून ९ तास चौकशी झाली. तसेच आजपासून देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा अनेक विविध मुद्यांवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले.

नोटा बदलण्यासाठी खुप जास्त वेळ दिला आहे. जनतेची गैरसोय होता कामा नये, वाखेडेसंदर्भात नवाब मलिक जे बोलले ते खरं निघालं. मलिकांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. असा आरोप अजित पवार यांनी केला. तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे. भाजपमध्ये गेलेल्यांची चौकशी होत नाही. सूडभावनेतून चौकशीला बोलवणं चुकीचं आहे. मी कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर प्रतिक्रिया देत नाही. असं स्पष्टपणे सांगत अजित पवार यांनी जयंत पाटील नारज असलेल्या चर्चेला पुर्णविराम दिला. मविआ एकजूट राहणार. एकजूट रहावी अशी आमजी भूमिका. मविआ कायम राहणार. मविआ मजबूत राहणार, स्टॅम्प पेपर द्या मी लिहून देतो. जागा वाटपासंदर्भात मविआमध्ये वेगवेगळी मत आहेत. पण अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील. असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम