भाजपची हिम्मत असेल तर आंदोलन करावे ; शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ नोव्हेबर २०२२ शिंदे गट व ठाकरे गटात वाकयुद्ध सुरूच आहे ते कुठेही थांबायचे नाव घेत नसून राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राणे परिवारावर तोफ डागली आहे. २०१५ मध्ये नीतेश राणे यांनी सावरकरांच्या विरोधात ट्विट केले होते. आता भाजपमध्ये आल्यावर सावरकरांवरून बोलणारे शेंड्यावरून शहाणे झालेले बोलायला लागले की, असे नाही बोलायचे तसे नाही बोलायचे, भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नारायण राणेंच्या कणकवलीमधील घरी जात आंदोलन करावे, असे आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. ​​​​​​
सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुम्ही सावरकरांचा अपमान करताय असे आता म्हणणारे राणे यांनी 2015 मध्ये सावरकरांनी माफी मागितली होती, असे ट्विट केले होते. त्यावर अंधारे म्हणाल्या की, भाजपने कणकणवलीमध्ये जात राणेंच्या घरात घुसून आंदोलन करावे आणि नीतेश राणेंना बाहेर काढत पालथा घालून तुडवावा. मग आम्ही मानू, असे अंधारेंनी म्हटले आहे. तर आम्हाला शहाणपणा सांगू नये असे म्हणत नीतेश राणेंना टोला लगावला आहे. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते, हे लक्षात असेलच देवेंद्र फडणवीस यांना असा टोला ही शायरीच्या माध्यमातून लगावला आहे.

औरंगाबादमधील 5 आमदार गेले, पण जनता ही बाळासाहेबांच्या सोबतच आहे. ज्या झाडाच्या खाली बसले त्यांच झाडाच्या मुळावर घाव घालायला निघाले आहे. जैस्वाल यांच्या संपत्ती विरोधात कायदेशीर कारवाई करणार असे म्हणतांना जैस्वाल असो की शिरसाट असो एकही जण पुन्हा निवडून येणार नाही, असे म्हणताना अंधारेंनी टीकास्त्र डागले आहे.
किरीट सोमय्या यांनी माझ्या केवळ 4 प्रश्नांची उत्तरे द्यावी. हे मी त्यांना अनेक दिवसांपासून प्रश्न विचारते आहे, पण ते माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही. मी शिवबंधन सोडत तुमचा गंडा बांधायला तयार आहे. पण सोमय्यांनी माझ्या 4 प्रश्नांची उत्तरे द्यावी असे म्हणत

2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांना तुमच्याकडे घेतले. यांच्यावर तुम्ही आरोप केले होते. मात्र, भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यामागे लागलेल्या चौकशी आणि तुमच्या आरोपाचे काय झाले, त्यांचा चौकशीचे काय झाले असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे. नोटीस पाठविल्यानंतर भावना गवळी, सचिन जोशी प्रताप सरनाईक यांच्यावर चार्जशीट कधी दाखल करणार आहे. भाजपकडे कोणती वॉशिंगमशीन आहे, की विरोधक भाजपमध्ये आला की इतका निर्मळ होतो असा सवालही सुषमा अंधारेंनी विचारला आहे. ती आम्हाला पाहिजे, मला ओवाळतील ती वॉशिंग मशीन द्यावी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम