काँग्रेसची पुन्हा सत्ता आली तर..अमित शहांचे वक्तव्य !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ ऑक्टोबर २०२३

देशभरात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने अनेक नेते आता पक्षाचा प्रचार करण्यासाठी आतापासूनच मैदानात उतरले आहे. यात भाजपसह कॉंग्रेस देखील मागे नाही. नुकतेच छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पुन्हा सत्ता आली तर लांगूलचालन व व्होटबँकेचे राजकारण सुरूच राहील, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी केली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या सत्ताकाळात छत्तीसगड राज्य काँग्रेस पक्षश्रेष्ठींसाठी जणूकाही एटीएम मशीन बनल्याचा आरोप शाह यांनी केला.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजनांदगाव येथे सभेला संबोधित केले. काँग्रेस सरकारने अन्नसाखळीप्रमाणे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी बनवली आहे. पण, भाजपच्या हाती सत्ता दिली तर भ्रष्टाचाऱ्यांकडून त्यांची काळी कमाई वसूल केली जाईल. त्यांना उलटे लटकवून सुतासारखे सरळ केले जाईल, अशा शब्दांत शाह कडाडले. अविभाजित मध्यप्रदेश-छत्तीसगड राज्य ‘बिमारू’ श्रेणीत होते. पण, २००३ साली डॉ. रमण सिंह मुख्यमंत्री बनले व त्यांनी १५ वर्षांत राज्याला विकसित बनवले. आता काँग्रेस राज्यात जातीय दंगली घडवू पाहत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात बेमेतरा जिल्ह्याच्या बिरनपूर गावात जातीय हिंसाचार घडला. यामागे काँग्रेस सरकारचा जातीय दंगल घडवण्याचा मनसुबा नव्हता काय ? असा तिखट सवाल अमित शाह यांनी उपस्थित केला. मतपेटी व लांगूलचालनाचे राजकारण करण्यापोटीच बिरनपूरमध्ये भूनेश्वर साहूची हत्या झाली. पण, आम्ह त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देणार आहोत. म्हणूनच भूनेश्वरच्या वडिलांना भाजपने प्राधान्याने तिकिट दिल्याचे शाह म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम