राष्ट्रवादीचे खासदार जर भाजपात आले तर तिकीट द्यावेच लागेल ; भाजप नेते !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ एप्रिल २०२३ ।  येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आता राष्ट्रवादीचे खा.अमोल कोल्हे भाजपात येणार असल्याची चर्चा अगदी दिल्लीपासून थेट राज्यातील गल्लीगल्लीत सुरु झाली असून आता या चर्चला खतपाणी घालण्यासाठी भाजपच्या नेत्यांनीही सुरुवात केल्याचे चित्र दिसू लागले आहे. यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केल्याने अनेकांच्या भुवयावर झाल्या आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या चार महिने आधी अमोल कोल्हे यांना भाजपमध्ये यावे वाटू शकते. त्यावेळी त्यांना विद्यमान खासदार म्हणून तिकीट द्यावेच लागेल, असे वक्तव्य करून कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धमाल उडवून दिली आहे. खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा यापूर्वी रंगल्या होत्या. ही चर्चा शांत होते न होते, तोपर्यंत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा कोल्हे खरेच भाजपच्या वाटेवर आहेत का, याची कुजबुज सुरू आहे.

खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा फेब्रुवारी महिन्यातही रंगली. विधान परिषदेच्या निवडणुकीत कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरमध्ये बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. त्यामुळे या चर्चेला सुरुवात झाली. आता चंद्रकांत पाटील यांनी एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना अमोल कोल्हे यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, 2019 मध्ये शिरूर येथून आढळराव पाटील निवडणूक लढले. त्यांना अमोल कोल्हे यांनी पाडले. आता समजा अमोल कोल्हेंना लोकसभा निवडणुकीच्या चार महिने भाजपमध्ये यावे वाटले, तर आम्हाला त्यांना तिकीट द्यावेच लागेल. ते विद्यमान खासदार आहेत. त्यानंतर विषय येईल की ते कुणाकडून लढणार? शिंदेंकडून की भाजपकडून? मग त्यांना विचारले जाईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम