राज्यात उन्हाचा चटका बसणार तर या ठिकाणी होणार किरकोळ पाऊस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ मार्च २०२३ ।  गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु, विदर्भातील चार जिल्हे वगळता कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण निवळले असून कमाल तापमानात ३ ते ४ अंशाने वाढ होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यांत ३० मार्चपर्यंत ढगाळ वातावरण व किरकोळ पावसाची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात उन्हाचा चटका हळूहळू वाढणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

ताजा पश्चिमी विक्षोभ ३० मार्चपर्यंत हिमालयापर्यंत पोहोचेल. पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि देशातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

पुढील २४ तासांत पश्चिम हिमाचल आणि अरुणाचल प्रदेशात हलकी ते मध्य स्वरूपाची बर्फवृष्टी होऊ शकते. उत्तर भारतात हवामान स्वच्छ राहील. हवामान संस्था स्कायमेट आणि आयएमडीनुसार, दक्षिण-पश्चिम राजस्थानमध्ये वादळी वारे वाहू शकतात. तेलंगण, दक्षिण छत्तीसगड आणि ओडिशामार्गे झारखंडपर्यत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे हवामानात बदल पाहायला मिळत आहेत. उत्तर भारतातील राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर हवामानात बदल झाला आणि मार्चच्या उष्णतेपासून दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार दिवस उत्तर भारतातील राज्यांत हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. तसेच दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या तापमानात २ अंशांपर्यंत वाढ होऊ शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम