ठाकरे गटाने दिले पुरावे तर शिंदे गटाला मिळाली मुदत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ नोव्हेबर २०२३

राज्यातील शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्ररणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर झाली आहे. यात दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर राहुल नार्वेकर यांनी देखील नाराजी व्यक्त केली. दोन्ही गटाच्या वकिलांनी वैयक्तिक टिप्पणी करु नये, असेही नार्वेकरांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाच्या वतीने व्हीप प्रकरणातील सर्व कागदपत्रे आजच सादर केली आहेत. तर शिंदे गटाला कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच सुनील प्रभु यांची साक्ष रेकॉर्डवर घेण्यात आली असून, त्याची उलटतपासणी देखील घेण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरपर्यंत या प्रकरणाचा निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यला व्हीप मिळाला नसल्याचा दावा केला आहे. तर त्यावर ठाकरे गटाने पुरावे सादर करण्याची परवानगी मागितली आहे. यावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी झाली.

दोन्ही गटाच्या वतीने व्हीपबाबत युक्तिवाद केला होता. त्या नंतर राहुल नार्वेकर यांनी आपला निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणी दोन नोव्हेंबररोजी दोन्ही बाजुंनी युक्तिवाद केला होता. आता या प्रकरणाच्या निकालाची प्रतीक्षा कायम आहे. तर दुसरीकडे राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना सर्व कागदपत्रे जमा करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणी 25 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम