‘तू मटण खाऊन आल्यामुळे भारताचा पराभव झाला’ : मोठ्या भावाने लहान्याला संपवलं !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २१ नोव्हेबर २०२३

भारतीय क्रिकेट संघाचा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव झाला. यामुळे कोट्यवधी भारतीयांची घोर निराशा झाला. काहींनी हा पराभव खिलाडूपणे स्वीकारला. तसेच ऑस्ट्रेलियाच्या विजेत्या संघाला शुभेच्छा दिल्या. पण काही लोकांना हा पराभव अद्याप स्वीकारता आला नाही. याची प्रचिती अमरावती जिल्ह्यात आली आहे. एका व्यक्तीने आपल्या लहान भावाची निर्घृण हत्या केल्याची घटना अमरावतीमध्ये घडली आहे. ‘तू मटण खाऊन आल्यामुळे भारताचा पराभव झाला’, असा दावा मोठ्या भावाने लहान्या भावाकडे केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती लगतच्या अंजनगाव बारी येथे ही घटना घडली. अंकित इंगोले (28) असे मृत तरुणाचे, तर प्रवीण इंगोले असे आरोपीचे नाव आहे. या घटनेत रमेश इंगोले हे आरोपीचे वडीलही गंभीर जखमी झाले आहेत. रमेश इंगोले रविवारी रात्री आपल्या दोन्ही मुलांसह विश्वचषकाचा अंतिम सामना पाहत होते. त्यावेळी हे तिघेही मद्यपानही करत होते. या सामन्यात भारताचा पराभव झाला. यामुळे दारूच्या नशेत असणाऱ्या प्रवीणने भाऊ व वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही मटण खाऊन आल्यामुळे भारत पराभूत झाला, असे तो शिवीगाळ करत ओरडत होता. त्यातच त्याच्या वडिलांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला.

यामुळे प्रवीण इंगोलेच्या संतापाचा पारा चढला. त्याने रागाच्या भरात घरातील लोखंडी रॉड काढला आणि थेट लहान भाऊ अंकित इंगोले याच्यावर हल्ला चढवला. यावेळी त्याने मध्यस्थी करणाऱ्या वडिलांनाही सोडले नाही. त्याने त्यांच्यावरही हल्ला केला. या घटनेत अंकित गंभीर होऊन खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर वडील रमेश इंगोले हे गंभीर जखमी झाले. त्यांना लगेचच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बडनेरा पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीनुसार प्रवीण विरोधात भादंवि 302, 307 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम