फ्लाईटमध्ये बसण्याआधी हे नियम वाचले नसेल तर होणार त्रास !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ फेब्रुवारी २०२३ । फ्लाईटमध्ये बसण्याचा सर्वाना विशेष वाटत असते. पण फ्लाईटमध्ये बसण्याचे सुद्धा काही नियम आहेत. त्याचसोबत काही गोष्टींची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्यातून जर का आपल्याला सेफ फ्लाईटचा अनुभव हवा असेल आणि शारिरीकरीत्या कसलाच त्रास होऊ नये म्हणूनही आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घेणे बंधनकारक असते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओज हे व्हायरल होत असतात ज्यात आपल्याला फ्लाईटमध्ये जाताना आणि येताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती कळते. सध्या इन्टाग्रामवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एक फ्लाईट अटेन्डंट म्हणजे एक हवाई सुंदरी आपल्या सर्वांना फ्लाईटच्या आधी टॉयलेटमध्ये का जाऊ नये याबद्दल सांगताना दिसते आहे.

सिएरा मिस्ट या एका हवाई सुंदरीनं आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात तिनं प्रवाश्यांना काही बेसिक टीप्स दिल्या आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की ती एअरपोर्टवर बसली आहे आणि तिनं मास्कही घातला आहे आणि ती व्हिडीओ शूट करते आहे. या व्हिडीओच्या सुरूवातीला ती सांगते की कशाप्रकारे आपण आपल्या जवळ काही बेसिक गोष्टी ठेवल्या पाहिजेत जसे की, खाण्याचे सामान. तिनं सांगितले की, जर का तुम्ही छोट्या किंवा मोठ्या प्रवासासाठी विमानातून प्रवास करणार असाल तर तुम्ही तुमच्याजवळ काहीतरी खाण्याचे सामान ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रवासात काही अडचण येणार नाही. अनेकदा फ्लाईट ही लेटही होते त्यामुळे आपल्याला अशावेळी आपल्यासोबत काहीतरी खायला ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

तिनं दुसरी टीप ती जी सर्वात महत्त्वाची आहे असं ती म्हणते, तिनं सांगितले की, तुम्ही फ्लाईटमध्ये बसल्यावर कधीही टॉयलेटला जाऊ नका कारण असे केल्यानं हवाई सुंदरी यांना प्रवाशांचे काऊंटिंग करताना म्हणजेच प्रवाशांची संख्या मोजताना अडथळे येतात. तेव्हा फ्लाईटमध्ये बसल्यावर अजिबातच टॉयलेटला जाऊ नका आणि शक्यतो टाळा. कुठेतरी एअरपोर्टवरच तुम्ही फ्रेश होऊ शकता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम