दै. बातमीदार । ३१ जानेवारी २०२३ । आपण नेहमी बघत असतो कि ग्रामीण भागातील रहिवासी लोक नेहमी निरोगी राहत असतात याचे कारण एकूण तुम्हाला धक्काच बसेल जे काम तुम्ही नेहमी करत नाही ते लोक ते काम नेहमी करीत असतात. आपण रात्री जर बाहेर जेवण केले तर घरी बनवलेली पोळी राहून जाते पण तीच पोळी जर तुम्ही सकाळी खाल्लीस तर तुम्ही भरपूर रोगापासून दूर राहाल.
घरी बनवलेल्या गरमागरम पोळ्या खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शिळी पोळ्या खाणे आरोग्यास हानिकारक आहे असे आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे अनेकदा ऐकले असेल, त्यामुळे ते नेहमी ताजी पोळ्या खाण्याचा आग्रह धरतात. असे बरेच लोक आहेत, ज्यांना फक्त ताज्या पोळ्या खायला आवडतात आणि शिळ्या पोळ्यांचे नाव ऐकताच राग येतो.
तुम्हाला माहित आहे का शिळी पोळ्या खाण्याचे अनेक फायदे आहेत? आजही आपल्या देशाच्या ग्रामीण भागात दुधासोबतच्या शिळ्या पोळ्या मोठ्या आवडीने खाल्ल्या जातात. विशेषतः उन्हाळ्यात लोक शिळी पोळ्या खाण्यास प्राधान्य देतात. चला जाणून घेऊया शिळी पोळ्या खाण्याशी संबंधित काही फायदे.
काही वेळा चुकीचे खाल्ल्याने किंवा जास्त तेल-मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अॅसिडिटीची तक्रार असते. अशा परिस्थितीत शिळी पोळ्या खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी नाश्त्यात दुधासोबत शिळी पोळ्या खा. यामुळे अॅसिडिटीमध्ये आराम मिळेल तसेच पोटाच्या इतर समस्याही दूर होतील.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम