प्रकाश आंबेडकर मोठे विधान : २०० पेक्षा जास्त जागा जिंकू !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ जानेवारी २०२३ । राज्यातील वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटासोबत युती केल्याने सर्वांचे लक्ष लागून असलेल्या युतीवर आज पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक विधान केले आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “ठाकरे गट-वंचित आघाडी एकत्र लढल्यास विधानसभेच्या १५० जागा येतील असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हे केलं आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आल्यास २०० पेक्षा जास्त जागा येतील. एकत्र लढण्याबाबत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सोबत बोलणार आहेत. तर पुढं म्हणाले आमची आणि ठाकरे गटाशी युती झाली आहे. पण अद्याप आम्ही महाविकास आघाडीचा भाग नाही, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील सभेत केला आहे. यावेळी आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा भाग होण्यासाठी सकारात्मकता दाखविली आहे. असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम