इतकावेळ झोप घेतल्यास होणार आरोग्यावर परिणाम !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ मार्च २०२३ । राज्यात सध्या उन्हाळ्याचा तडाखा सुरु असतांना प्रत्येक व्यक्ती दुपारच्या वेळेस झोप घेत आहे. पण हीच झोप तुमच्या आरोग्यावर त्रासदायक ठरू शकते. पुरेशी झोप घेणं किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. झोपेच्या कमतरतेमुळे, शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात, ज्यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, प्रत्येक व्यक्तीने रात्री 9 तासांची झोप पूर्ण केली पाहिजे. मात्र, आजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि जीवनशैलीमुळे अनेकदा झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. तुम्हाला माहीत आहे का की चांगली झोप न मिळाल्याने तुम्हाला त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात?

द सनच्या रिपोर्टनुसार, निद्रानाशामुळे तुमच्या डोळ्याभोवती डार्क सर्कल म्हणजेच काळी वर्तुळे निर्माण होतात. नीट झोप न लागल्याने डोळ्यांना सूज येऊ शकते. काही लोकांना खाण्याची जास्त इच्छा, राग आणि चिडचिड देखील जाणवते. याशिवाय थकवा, एकाग्रतेचा अभाव आणि चुका होण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही तीन दिवस पुरेशी झोप घेतली नाही तर ही लक्षणे तुमच्यामध्ये वेगाने दिसू लागतील.

काही लोकांना काही सेकंदांची झोप येते, ज्याला मायक्रोस्लीप म्हणतात. ही झोप 30 सेकंद टिकते आणि अनेक वेळा तुम्हाला त्याची जाणीवही नसते. झोपेच्या कमतरतेमुळे, तुम्ही तुमच्या कामात सक्रिय राहणार नाही किंवा झटपट निर्णय घेऊ शकणार नाही. असेही मानले जाते की ज्यांना नीट झोप येत नाही, त्यांचे वजनही झपाट्याने वाढते.
नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक दिवसातून 7 तासांपेक्षा कमी झोपतात त्यांचे वजन वाढण्याची शक्यता असते. तर जे लोक 7 तासांपेक्षा जास्त झोपतात त्यांना या समस्येचा सामना करावा लागत नाही. आपल्या शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यासाठी चांगली झोप आणि विश्रांतीची आवश्यकता असते. पण जेव्हा आपण हे करत नाही तेव्हा शरीरात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्तीवर देखील वाईट परिणाम करते, ज्यामुळे अनेक रोग होऊ शकतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम