जीवनात यश मिळवायचे असेल तर सॉफ्ट स्किल्स आत्मसात करावी लागतील – डॉ. अविनाश शिरसाठ

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

     पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करिअर विषयक मार्गदर्शन संपन्न झाले. पुणे येथील निलया फाउंडेशनच्या सौजन्याने वाणिज्य विभागाने हा उपक्रम आयोजित केला. निलया शैक्षणिक समूह, पुण्याचे विद्यार्थी सल्लागार डॉ. अविनाश शिरसाठ यांनी ‘सक्सेस मंत्रा : इंटेलिजन्स अँड स्किल्स’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अविनाश भंगाळे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांचे विशेष उपस्थिती होती.
   

     यावेळी बोलताना डॉ. अविनाश शिरसाठ म्हणाले की, जगात सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत स्वतःला टिकवायचे असेल तर स्वतःमध्ये अनेक सकारात्मक बदल घडवून आणावे लागतील. उत्तम करिअर हवे असेल तर मेहनत घेण्याची तयारी ठेवावी लागेल. त्यादृष्टीने संवाद कौशल्य, आत्मविश्वास, आधुनिक तांत्रिक ज्ञान, जिद्द, चिकाटी या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. तरच तरुणांना उत्तम करिअरची संधी मिळू शकते. सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स अंगी रुजवले तर रोजच्या जगण्यात समृद्धी येईल व कुठलेही आव्हान पेलताना अडचण येणार नाही.
डॉ. अविनाश भंगाळे यांनी अध्यक्षीय मनोगत केले तर प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

      निलया फाउंडेशनचे सचिन बोर्डे, प्रा. एम. डी. बिर्ला, डॉ. एन. व्ही. चिमणकर, डॉ. एस. जी. शेलार, प्रा. एस. एम. झाल्टे, डॉ. दिनेश तांदळे, डॉ. बी. एस. भालेराव, प्रा. आर.एम. गजभिये, डॉ.अतुल देशमुख, डॉ. जनार्दन देवरे, प्रा. प्रदीप वाघ, प्रा. प्रवीण देसले यांची उपस्थिती होती. वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सचिन हडोळतीकर यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन डॉ. गजानन चौधरी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. एस. ए. कोळी यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम