काही मिनिटांत मिसेस झुनझुनवाला यांनी कमावले ५०० कोटी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जुलै २०२३ ।  देशातील प्रसिद्ध टाटा उद्योग समूहातील कंपनी ‘टायटन’च्या ‘मल्टीबॅगर शेअर ने शुक्रवारी ३ टक्के उसळी घेतल्यामुळे दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला पोर्टफोलिओ सांभाळणाऱ्या त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांना शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांत सुमारे ५०० कोटी रुपयांचा लाभ झाला.

या तेजीमुळे टायटनचा समभाग ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ‘टायटन’च्या समभागात झुनझुनवाला परिवाराची मोठी गुंतवणूक आहे. समभाग तेजीत आल्यामुळे रेखा झुनझुवाला यांच्या संपत्तीत ४९४ कोटी रुपयांची भर पडली. टायटनच्या कमाईत २० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीचा समभाग उसळला आहे.

टायटन हा दिवंगत गुंतवणूकदार आणि बिगबुल राकेश झुनझुनवाला यांचा सर्वाधिक पसंतीचा समभाग होता. राकेश झुनझुनवाल यांचे १४ ऑगस्ट २०२२ रोजी निधन झाले. तेव्हापासून त्यांचा पोर्टफोलिओ त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला या सांभाळत आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ४,६९,४५,९७० समभाग आहेत. कंपनीतील त्यांची हिस्सेदारी ५.२९ टक्के आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम