सुषमा अंधारेंनी नीलम गोऱ्हेन दिल्या आगाऊ शुभेच्छा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जुलै २०२३ ।  राज्यातील ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केल्यावर ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील टीका केली आहे. पक्षाने सगळ्या संधी दिलेल्या असतानाही समोर मंत्रीपदाची संधी असल्याने त्यांनी ती घेतली. त्यांना तिकडे आरोग्य मंत्रीपदाची संधी मिळत असेल तर ही निश्चितच चांगली संधी आहे. मी त्यांच्यासाठी आनंदी आहे. मंत्रीपदासाठी त्यांना माझ्याकडून आगाऊ शुभेच्छा, असे म्हणत शिंदे गटात गेलेल्या नीलम गोऱ्हे यांना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टोमणा मारला.

दरम्यान पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, नीलम गोऱ्हे यांना तब्बल पाच वेळा विधानपरिषद आणि आता उपसभापती पद भूषवणाऱ्या पुरोगामी नीलम गोऱ्हे यांनी आज वेगळी भूमिका घेत आहेत. त्यांच्या या नवीन प्रवासाला शुभेच्छा आणि भावी आरोग्यमंत्री पदासाठी अ‍ॅडव्हान्समध्ये अभिनंदन…!! अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंवर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे की, त्या कोणावरही नाराज नाहीत. कारण नाराज होण्यासारखे काहीही कारण त्यांच्याकडे नाही. याचा दुसरा सरळ अर्थ असा की, समोर संधी दिसत असेल तर ती संधीचा फायदा घेतला पाहिजे. कारण संधी एकदाच दार ठोठावते. त्यांना संधी मिळाली आहे. वास्तविक पाहता पक्षानेही (ठाकरे गट) अनेकवेळा त्यांना संधी दिली आहे. त्यांना चार वेळा विधान परिषदेवर आमदारकी दिली. पक्षाने त्यांना परिषदेचे उपसभापती पद दिले, उपनेतेपद दिले. त्यांनी वापरलेला सटरफटर हा शब्द माझ्यासाठी नव्हे तर सामान्य शिवसैनिकांसाठी वापरला आहे.

नीलम गोऱ्हे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्यावर नाव न घेता टीका केली. सटरफटर लोकांमुळे मला नाराज होण्याचे कारण नव्हते. हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. संधीसाधू लोक गेले असतील, तर त्यांची जागा आम्ही भरून काढू. पण, सगळी पदे उपभोगल्यानंतर पक्षाला दगा देणे व वार करणे हे उच्च पदाधिकाऱ्यांना शोभत नाही, असे ते म्हणालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम